पश्चिम रेल्वे ४० मिनिटे उशिराने - Marathi News 24taas.com

पश्चिम रेल्वे ४० मिनिटे उशिराने

www.24taas.com,मुंबई
 
मुंबईत अंधेरी स्टेशनजवळ दोन लोकल्सची समोरासमोर धडक झाल्याने१५ प्रवासी जखमी झाले. या अपघाताचा परिणाम दुसऱ्या दिवशी दिसून आला आहे. पश्चिम रेल्वेची वाहतूक ४० मिनिटांनी उशिराने धावत  आहे. त्यामुळे सुट्टीच्या दिवशीही प्रवाशांचे हाल होत आहेत.
 
अंधेरी ते जोगेश्वरी दरम्यान दोन्ही लोकल एकाच ट्रॅकवर आल्याने हा अपघात झाला. लोकलचा वेग कमी असल्याने मोठी दुर्घटना टळली. यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नसली, तरी १५जण जखमी झालेत.
 
जखमींना उपचारांसाठी प्रवाशांच्या मदतीने कूपर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलंय. तर रात्रीपासूनच पश्चिम रेल्वेची सेवा विस्कळीत झालीये. आज सकाळीही ४० मिनिटे उशीराने लोकल धावत आहेत.

First Published: Sunday, June 17, 2012, 09:28


comments powered by Disqus