मंत्रालयाचा विमाच नाही! - Marathi News 24taas.com

मंत्रालयाचा विमाच नाही!

www.24taas.com, मुंबई
महाराष्ट्रातील अनेक मोठ्या प्रकल्पांचे आणि प्रकरणांची कागदपत्र असणाऱ्या मंत्रालयाला आज दुपारी आग लागली. या आगीत अनेक कागदपत्रे खाक झाली. अनेक मोठ्या वास्तूंचा आणि त्यातील वस्तूंचा विमा उतरविला जातो. परंतु, मंत्रालयाचा विमाच उतरविला नसल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
 
 
देशात चार मुख्य विमा कंपन्या आहेत. त्यात ओरिएंटल इन्शुरन्स, युनायटेड इन्शुरन्स, न्यू इंडिया इन्शुरन्स आणि इंडस्ट्रिअल इन्शुरन्स त्यापैकी तीन इन्शुरन्स कंपन्यांच्या प्रतिनिधीशी आमचे प्रतिनिधी अमोल देठे यांनी चर्चा केली. त्यात असे स्पष्ट झाले की, मंत्रालयाचा विमाच उतरविण्यात आलेला नाही.
 
 
महाराष्ट्र सरकारने रिअल एस्टेटमध्ये विम्या संदर्भातील नियम लागू केले होते. तसेच महाराष्ट्र सरकार फायर सेफ्टी संदर्भात काही गाइड लाइन्स आखल्या आहेत. मात्र, त्यांच्याच मुख्य इमारतीचा विमा नसल्याबद्दल संताप व्यक्त होत आहे. मंत्रालयाचा महाराष्ट्र सरकारने विमा का उतरविला नाही, असा सवाल उपस्थित करण्यात आला आहे.
 

First Published: Friday, June 22, 2012, 07:22


comments powered by Disqus