मंत्रालयातील आगीत तिघांचा मृत्यू - Marathi News 24taas.com

मंत्रालयातील आगीत तिघांचा मृत्यू

www.24taas.com, मुंबई
मंत्रालयातील आगीत तीघांचा जणांचा मृत्यू झाला असून दोन जण अद्यापही बेपत्ता असल्याची माहिती समोर आली आहे. उपमुख्यमंत्र्यांच्या दालनासमोर हे दोन मृतदेह सापडले असून ते दोघेही बारामतीचे आहेत.
 
महेश पोतेकर आणि उमेश गुगळे असे या दोघांची नावे आहेत. महेश पोतेकर बारामती सहकारी बँकेचे संचालक आणि माजी अध्यक्ष होते. ते आपल्या वडिलांच्या  अमृतमहोत्सव कार्यक्रमाची पत्रिका उपमुख्यमंत्री अजित पवार यांना द्यायला आले होते. तर उमेश गुगळे हे आडत व्यापारी आहेत.
 
तर तिसऱ्या मृतदेहाची माहिती अद्याप मिळालेली नाही. त्याची ओळख पटविण्याचे काम सुरू आहे.
 
 

First Published: Thursday, June 21, 2012, 22:56


comments powered by Disqus