Last Updated: Friday, June 22, 2012, 21:14
www.24taas.com, मुंबई 
जुहूतल्या ओकवूडमध्ये झालेल्या रेव्ह पार्टीप्रकरणी ४४ जणांनी ड्रग्ज घेतल्याचं उघड झालं आहे. या पार्टीमधल्या ४६ जणांची टेस्ट करण्यात आली होती. त्यापैकी ४४ लोकांना ड्रग्ज घेतल्याचं निष्पन्न झालं आहे.
३८ तरुणी आणि ५२ तरुणांची टेस्ट करण्यात आली होती. २० मे रोजी ओकवूड हॉटेलमध्ये ही पार्टी झाली होती. जुहूच्या ‘ओकवूड’ या उच्चभ्रू हॉटेलवर छापा टाकण्यात आला होता. रेव्ह पार्टी सुरु असल्याच्या माहितीवरुन पोलिसांनी ही कारवाई केली होती.
अतिरिक्त पोलीस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली होती. त्यात ३८ मुली आणि ५८ मुलांना ताब्यात घेण्यात आलं होतं.
First Published: Friday, June 22, 2012, 21:14