Last Updated: Monday, June 25, 2012, 17:07
www.24taas.com, मुंबईप्रसिद्ध अभिनेता नाना पाटेकर याचा आचारी संतोष सिंह हादेखील राष्ट्रपती पदाच्या शर्यतीत उतरला असून ही निवडणूक लढविण्यासाठी त्याने अर्जदेखील भरला आहे.
‘आंच’ चित्रपटाच्या शूटिंगसाठी नाना पाटेकर हे वाराणसी येथे गेलेले असताना त्यांची संतोष सिंहबरोबर ओळख झाली. या शूटिंगदरम्यान वेगवेगळे चविष्ट आणि रुचकर पदार्थ खायला घालून संतोष सिंहने नाना पाटेकर यांचे मन जिंकले. शूटिंग संपल्यानंतर तो पाटेकर यांच्यासोबत चक्क मुंबईला येऊन त्यांचा आचारीही झाला. तेव्हापासून तो नाना पाटेकर यांच्या घरी आचार्याचे काम करीत आहे.
.मी जिवंत आहे.....संतोषची सुप्रिया नावाच्या दलित युवतीशी मैत्री झाली. या मैत्रीचे रूपांतर प्रेमात होऊन दोघांनी लग्नही केले. मात्र दलित युवतीशी लग्न केल्यामुळे संतप्त झालेल्या संतोषच्या घरच्यांनी त्याला वाळीत टाकले.
एवढेच नव्हे तर संतोषशी कोणताही संबंध ठेवावा लागू नये म्हणून त्याला मृत घोषित करून त्याच्या मृत्यूचा दाखलाही तयार केला. परंतु आपण मृत नसून जिवंत आहोत हे दाखविण्यासाठी आपण ही निवडणूक लढवीत आहोत असे संतोषचे म्हणणे आहे.
First Published: Monday, June 25, 2012, 17:07