मसाज सेंटर की वेश्या व्यवसाय? - Marathi News 24taas.com

मसाज सेंटर की वेश्या व्यवसाय?


झी २४ तास वेब टीम, मुंबई
 
मुंबईत दिवसेंदिवस स्पा आणि मसाज सेंटर वाढत आहे. त्याचसोबत या मसाज सेंटरच्या नावाखाली अनैतिक धंदे सुरू असल्याचे मुंबईच्या समाज सेवा शाखेला समजल्यावर त्यांनी अश्या स्पा सेंटरवर छापा सत्र सुरू केलं आहे. मुंबईत चार बंगला भागात एका स्पा सेंटरवर छापा मारण्यात आला0. समाज सेवा शाखा आणि वर्सोवा पोलिसांनी ही कारवाई केली.
 
त्यात सात मणिपूरी तरूणींसह सेंटरच्या मॅनेजर, कॅशियर आणि ऑपरेटरला अटक करण्यात आली. स्पा सेंटरमध्ये वेश्या व्यवसाय सुरू असल्याची माहिती समाज सेवा शाखेला मिळाली होती. त्यानंतर बोगस ग्राहक तिथं पाठवून खातरजमा झाल्यानंतर ही कारवाई करण्यात आली.

First Published: Saturday, December 10, 2011, 06:11


comments powered by Disqus