आदर्श प्रकरणी जयंत पाटलांना नोटीस! - Marathi News 24taas.com

आदर्श प्रकरणी जयंत पाटलांना नोटीस!

www.24taas.com, मुंबई
आदर्शप्रकरणी ग्रामविकासमंत्री जयंत पाटलांना चौकशी आयोगानं नोटीस बजावलीए. त्यांना 7 जुलैपर्यंत प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश आलेत. पुतण्या आदित्य पाटलाचा आदर्शमध्ये फ्लॅट असल्याचं पुढे आलं. त्यामुळे जयंत पाटील यांना फ्लॅटविषयी स्पष्टीकरण देण्याचे आदेश देण्यात आलेत.
 
विलासरावांच्या मंत्रिमंडळात 1999 ते 2003 आणि 2004 ते 2008 दरम्यान जयंत पाटील वित्तमंत्री होते. या आठवड्यात विलासराव विलासराव देशमुख आणि सुशीलकुमार शिंदे यांची आयोगासमोर चौकशी झाली.
 
त्यावेळी विलासराव देशमुखांनी सर्व फाईल्स मुख्यमत्र्यांनी पाहणं शक्य नसल्याचं सांगत वित्त, महसूल खात्याकडे बोट दाखवलं होतं. त्यानंतर आयोगानं त्यांना नोटीस बजावलीए.
 

First Published: Thursday, June 28, 2012, 22:25


comments powered by Disqus