Last Updated: Saturday, June 30, 2012, 18:52
www.24taas.com, मुंबई प्रणव मुखर्जी आणि पी. ए. संगमा यांनी राष्ट्रपतीपदाचा उमेदवारी अर्ज दाखल करताना केलेल्या शक्तीप्रदर्शनावर शिवसेनाप्रमुखांनी टीका केली आहे. याचबरोबर प्रणव मुखर्जींना दिलेला पाठिंबा म्हणजे यूपीएला दिलेला पाठिंबा नव्हे, असंही शिवसेनाप्रमुख म्हणाले.
राष्ट्रपतीमपदाचे दावेदार असणाऱ्या संगमा आणि मुखर्जी या दोघांवरही बाळासाहेबांनी टीकास्त्र सोडलं आहे. ‘दोघाही उमेदवारांकडे स्वबळावर निवडून येण्याची क्षमता नसल्यानं, इतर पक्षांकडून पाठिंबा मिळवला जात आहे’ असं बाळासाहेबांना म्हटलं आहे. तसंच मुखर्जी राष्ट्रपती भवनात गेल्यास सध्याच्या अराजक परिस्थितीवर मात करण्याची क्षमताही त्यांच्यातच असल्याचं शिवसेनाप्रमुखांनी म्हटलंय.
मात्र काँग्रेसनं या निमित्तानं केलेल्या शक्तीप्रदर्शनाला शिवसेनाप्रमुखांनी टोला लगावलाय. युपीएच्या वरातीत सामील होण्याची शिवसेनेची इच्छा नव्हती. पाठिंब्याची लक्ष्मणरेषा प्रणव मुखर्जींच्या पाठिंब्यापुरतीच असल्याचंही शिवसेनाप्रमुखांनी स्पष्ट केलंय.
First Published: Saturday, June 30, 2012, 18:52