खाद्य सुरक्षा विधेयकावर राष्ट्रपतींची स्वाक्षरी

Last Updated: Saturday, July 6, 2013, 13:57

गरिबांना कमी दराने धान्य मिळावे यासाठी केंद्रातील युपीए सरकारने खाद्य सुरक्षा विधेयक आणलेय. मात्र, या विधेयकाला विरोधकांनी विरोध केला. लोकसभेत या विधेयकावर म्हणावी तशी चर्चा झालेली नाही. हे विधेयक लोकहिताचे नसल्याचे सांगून विरोधकांनी ते मागे घेण्याची मागणी केली. मात्र, केंद्रातील सरकारने अध्यादेश काढून विधेयक मांडले. या विधेयकावर आता राष्ट्रपतींनी स्वाक्षरी केल्याने त्याचा मार्ग मोकळा झालाय.

प्रणव मुखर्जींमध्येच क्षमता आहे- बाळासाहेब

Last Updated: Saturday, June 30, 2012, 18:52

प्रणव मुखर्जी आणि पी. ए. संगमा यांनी राष्ट्रपतीपदाचा उमेदवारी अर्ज दाखल करताना केलेल्या शक्तीप्रदर्शनावर शिवसेनाप्रमुखांनी टीका केली आहे. याचबरोबर प्रणव मुखर्जींना दिलेला पाठिंबा म्हणजे यूपीएला दिलेला पाठिंबा नव्हे, असंही शिवसेनाप्रमुख म्हणाले.

'डीएमके'चाही प्रणवदांना पाठिंबा

Last Updated: Saturday, May 5, 2012, 19:37

राष्ट्रपतीपदाच्या शर्यतीमध्ये काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि अर्थमंत्री प्रणव मुखर्जी यांची आगेकूच कायम आहे. डीएमके या पक्षानेही आता मुखर्जी यांच्या नावाला संमती दिली आहे. प्रणव मुखर्जी यांच्या नावाला आमचा विरोध नाही, असं तमिळनाडूचे माजी मुख्यमंत्री आणि डीएमकेचे प्रमुख करुणानिधी यांनी स्पष्ट केलं.

जागतिक बाजारपेठेतून थेट इंधन खरेदी

Last Updated: Wednesday, February 8, 2012, 08:57

जागतिक बाजारपेठेतून भारतीय विमान कंपन्यांना थेट इंधन खरेदी करू देण्यास केंद्र सरकारने अखेर मान्यता दिली आहे. केंद्रीय अर्थमंत्री प्रणव मुखर्जी यांच्या अध्यक्षतेखालील विशेष मंत्रिगटाने थेट इंधन खरेदीला ग्रीन सिग्नल दाखविला आहे.