Last Updated: Sunday, July 1, 2012, 20:58
www.24taas.com, मुंबईमुंबईत जुहू बिचवर तीन तरुण बुडाले आहेत. जब्बीर, अरबाज आणि निकेत अशी या तिघांची नावं आहेत.. लाईफ गार्डकडून या तरुणांचा शोध सुरु आहे.. रविवारी सुट्टी साजरी करण्यासाठी हे तरुण या ठिकाणी आले होते.. मात्र पोहण्याच्या नादात खोल समुद्रात गेल्यानं हे तिघेही बुडाले आहेत.
लोणावळा इथं भूशी डॅममध्ये बुडून तरुणाचा मृत्यू झालाय. चेतन स्वामी असं या तरुणाचं नाव आहे. इंदूरचा रहिवासी असलेला चेतन तळेगावमध्ये कामाला होता. 5-6 मुलांबरोबर तो धरणात पोहायला गेला. मात्र पोहता येत नसल्यानं धरणात बुडून त्याचा मृत्यू झाला.
चेतन एका खासगी कंपनीत कामाला होता. मित्राचा वाढदिवस साजरा करण्यासाठी तो सर्वांना घेऊन लोणावळ्यात आला होता. सर्वच पर्यटकांना भूशी डॅमचं आकर्षण असतं. चेतन स्वामीही त्याच्या मित्रांबरोबर तिथं गेला. मात्र पोहता येत नसतानाही पाण्यात उतरल्यानं त्याचा मृत्यू झाला.
First Published: Sunday, July 1, 2012, 20:58