सेनेला यश... दीपक सावंत दुसऱ्यांदा विजयी - Marathi News 24taas.com

सेनेला यश... दीपक सावंत दुसऱ्यांदा विजयी

www.24taas.com, मुंबई
 
मुंबई पदवीधर मतदारसंघातून शिवसेनेचे उमेदवार दीपक सावंत विजयी झाले आहेत. दीपक सावंत यांनी सुरेंद्र श्रीवास्तव यांचा पराभव केला आहे. मुंबई पदवीधर मतदारसंघातून दीपक सावंत विजयी झाले.
 
शिवसेनेचे उमेदवार दीपक सावंत यांनी सुरेंद्र श्रीवास्तव यांचा पराभव केला. पदवीधर मतदारसंघातून सलग दुसऱ्यांदा विजय मिळवित दीपक सावंत यांनी आपला गड राखला आहे, त्यांना पदवीधर मतदारसंघातून दुसऱ्यांदा मिळालेल्या संधीचं सोनं करीत त्यांनी विजयाची चव चाखली.
 
पदवीधर मतदारसंघात शिवसेनेची सरशी  झाली. तर दुसरीकडे सुरेंद्र श्रीवास्तव यांचा सहजपणे पराभूत झाला आहे. मुंबई पदवीधर मतदारसंघात सेनेला हे घवघवती यश मिळाले आहे. मुंबई पदवीधरसाठी शिवसेनेचे विद्यमान आमदार दीपक सावंत रिंगणात होते. आणि त्यांचा विजय निश्चित मानण्यात येत होता.
 
 
 

First Published: Wednesday, July 4, 2012, 17:27


comments powered by Disqus