Last Updated: Tuesday, July 10, 2012, 09:31
www.24taas.com, मुंबई मुंबईत रात्री एका कॉल सेंटरच्या गाडीनं अचानक पेट घेतला. ही आग इतकी जबरदस्त होती की क्षणार्धात ही गाडी जळून खाक झाली. सुदैवानं यातून ड्रायव्हर बचावला.
ही गाडी गोरेगावहून चर्चगेटला जात होती त्यावेळी ही दुर्घटना घडली. कर्मचाऱ्यांना घरी सोडून तो जात असताना अचानक गाडीने पेट घेतला. गाडीला कशी लागली? हे ड्रायव्हरलाही समजलं नाही. गाडीला आग लागलेली पाहून ड्रायव्हर भयंकर घाबरलेला होता. त्यात गाडी जळाली तरी ड्रायव्हर सुदैवानं बचावला आणि वाहनात कुणी कर्मचारी नसल्यानं मोठी हानी टळली.
First Published: Tuesday, July 10, 2012, 09:31