आवक घटली, भाज्या कडाडल्या... - Marathi News 24taas.com

आवक घटली, भाज्या कडाडल्या...

www.24taas.com, मुंबई
 
पावसानं ओढ दिल्यानं मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत गेल्या चार दिवसांपासनं भाज्यांची आवक कमी झालेली दिसून येत आहे.  भाज्यांचे भाव १० ते १५ टक्क्यांनी वाढलेले दिसतात.
 
समाधानकारक पाऊस न झाल्यास परिस्थिती आणखी बिकट होईल, अशी भीती व्यापारी व्यक्त करताय आहेत. भाजीपाला मार्केटमध्ये रोज ५०० हून अधिक गाड्या येतात. मात्र, मंगळवारपासूनं आवक ६० ते ७० गाड्यांनी कमी झाली आहे. त्यामुळं टोमॅटो, फ्लॉवर, कोबी, दुधी, वांगी या भाज्यांचे दर वाढलेत. ४० ते ६० रुपये किलो असे भाव आहेत. तर पालेभाज्यांची हीच परिस्थिती आहे. घाऊकमध्ये मेथी, आणि कोथिंबीरची जोडी १४ ते १८ रुपये तर किरकोळमध्ये २० ते २४ रुपयांपर्यंत विकली जात आहे.

First Published: Saturday, July 14, 2012, 12:20


comments powered by Disqus