'सेक्स सीडी' नरेंद्र मोदी अडचणीत? - Marathi News 24taas.com

'सेक्स सीडी' नरेंद्र मोदी अडचणीत?

www.24taas.com, मुंबई
 
गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांची वाढती लोकप्रियता लक्षात घेता, काँग्रेसने नवी चाल खेळण्यास सुरवात केली आहे. काँग्रेस मोदींची सेक्स सीडी बनवित आहे. जी गुजरात विधानसभेच्या आधी सगळीकडे पसरविण्यात येणार आहे. असा दावा केला आहे तो शिवसेनेने. शिवसेनेच्या अशा या वक्तव्यामुळे मात्र चांगलीच खळबळ माजली आहे. शिवसेनेचे हिंदी मुखपत्र असणारे 'दोपहर का सामना' मध्ये 'सेक्स सीडी मोदी की' या शीर्षकाखालीच ही बातमी छापण्यात आली आहे. आणि त्यात काँग्रेसने ही सगळी खेळी केली आहे. असे यात म्हटले आहे.
 
काँग्रेसने मोदींची प्रतिमा खराब करण्यासाठी अशाप्रकारचा अपप्रचार करणारी एक सेक्स सीडी बनविण्याची तयारी चालविली आहे. आणि या सीडीमध्ये एक तमिळ अभिनेत्रीचा समावेश करण्यात आला आहे. तिला त्यासाठी भरपूर रक्कमही देण्यात आली आहे. 'दोपहर का सामना' मध्ये विधानसभेत मोदींना पाडण्यासाठी काँग्रेसने अशा गुप्त पद्धतीने एक सीडी बनविण्याचा घाट घातला असल्याचा आरोप करण्यात आला आहे.
 
या सीडीमध्ये नरेंद्र मोदी यांचा विरोधात षडयंत्र रचल्याचे म्हटले जात आहे. त्यामुळे गुजरातमध्ये एकच खळबळ उडाली आहे. या सेक्स सीडीमध्ये काम करण्यासाठी तमिळ अभिनेत्रीला मुंबईत एक फ्लॅट दिल्याचेही समोर आले आहे. ही सीडी मिळविण्यासाठी अनेकजण प्रयत्नशील आहेत. त्यामुळे आता नक्की काय होणार गुजरात निवडणुकीआधी... पक्ष या सीडीची दखल घेईल का? पक्ष मोदींवर काही कारवाई करेल का? हे सगळेच प्रश्न उभे ठाकले आहेत.
 
 
 

First Published: Wednesday, July 18, 2012, 15:09


comments powered by Disqus