Last Updated: Wednesday, July 18, 2012, 18:10
www.24taas.com, मुंबई ज्येष्ठ समाजवादी नेत्या मृणालताई गोरे यांच्या पार्थिवावर ओशिवारा इथल्या स्मशानभूमित अंत्यसंस्कार करण्यात आले. केशव गोरे स्मारक ट्रस्ट इथून त्यांची अंत्ययात्रा निघाली. हजारो शोकाकूल नागरिकांनी मृणालताईंना अखेरचा निरोप दिला.
पाणीवाली बाई म्हणून अवघ्या महाराष्ट्राला परिचित असलेल्या लढाऊ मृणालताईंनी सामान्यांचे प्रश्न सोडवण्याचा ध्यास घेतला.. संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यातही त्यांनी मोलाचं योगदान दिलं. त्याशिवाय अनेक सामाजिक आणि महिलांच्या प्रश्नासाठी आयुष्यभर लढा दिला. स्त्री भ्रूण हत्येचं बील सर्वप्रथम त्यांनी सादर केलं होतं.
मृणालताई गोरे यांचं मंगळवारी ह्रदयविकाराच्या झटक्यानं निधन झालं. मृणालताईंनी वयाच्या ८४ व्या वर्षी जगाचा निरोप घेतला. वसईतल्या कार्डिनल ग्रेसेस रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यातही त्यांनी मोलाचं योगदान दिलं. त्याशिवाय अनेक सामाजिक आणि महिलांच्या प्रश्नासाठी आयुष्यभर लढा दिला. स्त्री भ्रूण हत्येचं बील सर्वप्रथम त्यांनी सादर केलं होतं. वसईतल्या देवतलाव परिसरात त्यांच्या मुलीच्या घरी त्या राहण्यासाठी आल्या होत्या. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, आमदार भाई जगताप, मंत्री राजेंद्र गावित यांच्यासह विविध राजकीय नेते आणि सामान्य जनतेनं या रणरागिणीला आदरांजली वाहिली.
First Published: Wednesday, July 18, 2012, 18:10