डॉ. आंबेडकर स्मारकासाठी ४ एकर जागा? - Marathi News 24taas.com

डॉ. आंबेडकर स्मारकासाठी ४ एकर जागा?

झी २४ तास वेब टीम, नवी दिल्ली
 
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकासाठी दादरमधल्या इंदू मिलची साडे बारा एकर जागा देण्याची मागणी होत असताना राज्य सरकारनं ४ एकर जागेचीच मागणी केल्याची माहिती वस्त्रोद्योग राज्यमंत्री पनाबाका लक्ष्मी यांनी राज्यसभेत दिली.
 
 
राज्य सरकारनं आंबेडकर स्मारकासाठी ४ एकर जागा मागितली असून ती देण्याची तयारी वस्त्रोद्योग मंडळानं दर्शवलीय. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी विचारलेल्या प्रश्नाला राज्यसभेत हे लेखी उत्तर देण्यात आलं.रिपब्लिकन पक्षाच्या वेगवेगळ्या संघटनांनी इंदू मिलची सर्वच्या सर्व म्हणजे साडे बारा एकर जागा स्मारकासाठी मागितली आहे.
 
राज्य सरकारनं तशी मागणी केंद्राकडे केल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली होती. मात्र राऊत यांना वस्त्रोद्योग राज्यमंत्र्यांनी दिलेल्या उत्तरात राज्य सरकारनं याआधी ४  एकर जागा स्मारकासाठी मागितल्याची माहिती देण्यात आली असून त्यावर विचार करण्याची तयारी दर्शवण्यात आलीय.

First Published: Thursday, December 15, 2011, 10:26


comments powered by Disqus