Last Updated: Friday, July 20, 2012, 16:55
www.24taas.com, मुंबई 
मुंबई पश्चिम रेल्वेची लोकल वाहतूक कोलमडली आहे. अचानक २०० मोटरमन हे रजेवर गेले आहेत. त्यामुळे पश्चिम रेल्वेची वाहतूक खोळंबली आहे. रेल्वे प्रशासनाच्या मनमानीविरोधात मोटरमन हे रजेवर गेले आहेत.
२०० हून अधिक मोटरमन आता रजेवर जाण्याच्या तयारीत असल्याचे समजते आहे. त्यामुळे चाकरमान्यांचे चांगलेच हाल होण्याची शक्यता आहे. ऐन संध्याकाळच्या वेळेस वाहतूकीचा खेळखंडोबा झाल्याने पश्चिम रेल्वेच्या प्रवाशांना मनस्ताप होणार आहे.
गेल्यावर्षीच पश्चिम रेल्वेचे ६० मोटारमन अचानक संपावर गेले होते. सहकाऱ्याला बडतर्फ केल्याच्या निषेधार्थ मुंबईतील पश्चिम रेल्वेने हा संप केला होता. एकूण ४५० पैकी ६० मोटरमनने अचानक संपावर जाण्याचा निर्णय घेतला होता. सुरूवातीला त्यांनी आजारी असल्याचं कारण देऊन कामावर गैरहजर राहण्याचे सांगितले होते. त्यानंतर सर्व ६० मोटरमनने संपावर गेले होते. आताही अशाच प्रकारे मोटरमन रजेवर गेल्याने वाहतुकीचा चांगलाच खेळखंडोबा झाला आहे.
First Published: Friday, July 20, 2012, 16:55