Last Updated: Friday, July 20, 2012, 20:38
www.24taas.com, मुंबई मोटरमेननं अचानक पुकारलेल्या आंदोलनामुळे मुंबईकरांचे ‘मेगाहाल’ झाले... पश्चिम रेल्वे प्रवाशांचा उद्रेक चर्चगेट स्टेशनवर पाहायला मिळाला. कित्येक तास खोळंबलेल्या प्रवाशांनी चर्चगेट रेल्वे स्टेशनवर तोडफोड केली.
काहीही पूर्वकल्पना न देता सामूहिक रजेवर गेलेल्या मोटरमेननं प्रवाशांना वेठिस धरल्याची भावना अनेक प्रवाशांनी व्यक्त केली होती. ऐन संध्याकाळच्या वेळी झालेल्या या अघोषित आंदोलनामुळे घरी जायचं कसं, असा प्रश्न मुंबईकरांना पडला होता. तब्बल चार तास या संपाबाबत रेल्वे प्रशासनाकडून प्रवाशांना काहीच काहीच माहिती मिळत नव्हती. त्यामुळं आम्हाला वाली कोण? असा संतप्त सवाल मुंबईकरांना पडला. आणि एका क्षणाला प्रवाशांच्या सहनशीलतेचा अंत झालाच. अखेर हा संतापाचा लाव्हा तोडफोडीच्या रुपानं व्यक्त झाला.
व्हिडिओ पाहण्यासाठी :
First Published: Friday, July 20, 2012, 20:38