मोटरमेनचं आंदोलन बेतलं महिलेच्या जीवावर

Last Updated: Saturday, July 21, 2012, 17:24

मुंबईत काल पश्चिम रेल्वेच्या मोटरमेननं केलेल्या आंदोलनामुळे उसळलेल्या गर्दीत एका महिला प्रवाशाचा नाहक बळी गेल्याची घटना समोर आलीय. पालघरच्या रिना कुलकर्णी या महिलेचा बोरिवलीजवळ ट्रेनमधून पडून दुर्दैवी मृत्यू झालाय.

'चर्चगेट'वर उसळला संतापाचा ‘लाव्हा’

Last Updated: Friday, July 20, 2012, 20:38

मोटरमेननं अचानक पुकारलेल्या आंदोलनामुळे मुंबईकरांचे ‘मेगाहाल’ झाले... पश्चिम रेल्वे प्रवाशांचा उद्रेक चर्चगेट स्टेशनवर पाहायला मिळाला. कित्येक तास खोळंबलेल्या प्रवाशांनी चर्चगेट रेल्वे स्टेशनवर तोडफोड केली.

प. रेल्वे रुळावर, मोटरमनची माघार आश्वासनांवर!

Last Updated: Friday, July 20, 2012, 20:58

पश्चिम रेल्वेच्या मोटरमनने संप अखेर मागे घेण्यात आलाय. डीआरएमच्या बैठकीत हा निर्णय झालाय. यामध्ये मोटरमनच्या काही मागण्यांवर विचार करणार असल्याचं सांगण्यात आलंय. मात्र चार तास मोटरमनच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे मोठे हाल झाले. प. रेल्वेच्या विभागीय महाव्यवस्थापकांसोबत झालेल्या यशस्वी चर्चेनंतर हा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे रेल्वे वाहतूक पुन्हा सुरू झाली असून स्टेशनांवर अडकून पडलेल्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे.