Last Updated: Monday, July 30, 2012, 12:26
www.24taas.com, मुंबई 
मुंबईत नाहूर स्टेशनजवळ बेस्टनं स्कूलबसला धडक दिलीय. या अपघातात ३ विद्यार्थी जखमी झाले आहेत. तर एकूण सहा जण जखमी झाले आहेत. जखमींवर मुलुंडच्या फोर्टीज रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
ऐरोलीच्या युरो इंग्लिश मिडियम स्कुलची बस नाहूरहून ऐरोलीकडे निघाली होती. तर बेस्टची ५११ नंबरची बस नवी मुंबईहून अंधेरीकडे निघाली होती. त्याचवेळी नाहूर ब्रीजवर समोरासमोर टक्कर झाली.
नाहूर रेल्वे स्थानकाजवळ एका बेस्ट बसने ड्यूरो स्कूलच्या बसला धडक दिली. या धडकेत तीन विद्यार्थी, एक शिक्षिका, ड्रायव्हर, आणि क्लिनर जखमी झाले आहेत. जखमींपैकी तिघांना फॉर्टिस रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून इतर तीन जण अग्रवाल रुग्णालयात उपचार घेत आहेत.
First Published: Monday, July 30, 2012, 12:26