राज्यातील प्रस्तावित चार सेझ रद्द - Marathi News 24taas.com

राज्यातील प्रस्तावित चार सेझ रद्द

www.24taas.com, मुंबई
 
राज्यात चार प्रस्तावित सेझ रद्द करण्यात आलेत. महाराष्ट्र ओद्योगीक डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन म्हणजेच एमआयडीसीच्या आज झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
 
इंडीया बुल्स, व्हिडीओकॉन, महिंद्रा अँण्ड महिंद्रा कंपनीचे सेझ प्रकल्प रद्द करण्यात आलेत. रायगड, पुणे, औरंगाबाद येथील हे प्रस्तावित प्रकल्प रद्द करण्यात आले. या प्रकल्पांना शेतक-यांनी विरोध केल्यानं हा निर्णय घेण्यात आला.
 
रायगडमधील रिलायन्स कंपनीच्या खोपटा सेझलाही शेतकरी  कडाडून विरोध करीत होते. या प्रकल्पाला घालविल्याशिवाय शेतकरी गप्प बसणार नाहीत, असा इशारा प्रा. एन. डी. पाटील यांनी दिला होता.
 
'सेझ'साठी शक्‍यतो लागवडीखालील सुपीक जमीन घेऊ नये, अन्यथा होणारी हानी फार मोठी असेल, असे तोंडी मत उच्च न्यायालयाने व्यक्त केले होते. पुणे जिल्ह्यातील खेड-राजगुरुनगर जवळच्या एमआयडीसी-भारत फोर्ज यांच्या "सेझ'साठी हजारो हेक्‍टर सुपीक जमीन संपादित करण्याच्या सरकारच्या कृतीला उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले होते. गुळणी-वरुडे गावच्या दिलीप ढेरंगे, भगवान गुळणकर आदी सुमारे सोळा ग्रामस्थांनी ऍड. सुनील दिघे यांच्यामार्फत ही याचिका सादर केली होती.

First Published: Monday, July 30, 2012, 20:45


comments powered by Disqus