अंधेरीत सेक्स रॅकेटचा पर्दाफाश - Marathi News 24taas.com

अंधेरीत सेक्स रॅकेटचा पर्दाफाश

झी २४ तास वेब टीम, मुंबई
 
मुंबईत गेल्या काही दिवसापूर्वी मसाज सेंटरच्या नावाखाली चालणाऱ्या वेश्या व्यवसायावर धाड टाकून काही दिवस लोटत नाही तोच काला रात्री पुन्हा एकदा एका सेक्स रॅकेटचा पर्दाफाश करण्यात आला आहे. मुंबईतल्या अंधेरीत सेक्स रॅकेटचा पर्दाफाश करण्यात आला आहे.
 
अंधेरी पश्चिमेतल्या म्हाडा कॉलनीत हे सेक्स रॅकेट कार्यरत होतं. या प्रकरणी पोलिसांनी २२ मुली आणि १३ दलालांना अटक केली आहे. पोलिसांच्या समाजसेवा शाखेनं ही कारवाई केली आहे. म्हाडा कॉलनीतील भाड्याच्या फ्लॅटमध्ये हे सेक्स रॅकेट सुरु होते. पोलिसांनी बनावट ग्राहक पाठवून या प्रकरणाची खातरजमा केली. त्यानंतर पोलिसांनी छापा टाकला. रॅकेटमध्ये सापडलेल्यांवर पीटांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

First Published: Sunday, December 18, 2011, 05:27


comments powered by Disqus