राज्यात पोलिसांची २२ हजार पदं रिक्त - Marathi News 24taas.com

राज्यात पोलिसांची २२ हजार पदं रिक्त

www.24taas.com, मुंबई
 
एकीकडे पुतळ्यांना अशी सुरक्षा पुरवावी लागतेय आणि दुसरीकडे राज्यात पोलिसांची २२ हजार पदं रिक्त आहेत. पोलिसांची संख्या कमी असल्यानं दहशतवादी आणि नक्षलवाद्यांच्या कारवाया वाढल्या आहेत, असा अहवालच लोकलेखा समितीनं विधिमंडळाच्या अधिवेशनात सादर केलाय.
 
एकीकडे दहशतवादी आणि नक्षलवाद्यांचे आव्हान पोलिसांपुढे आहे. त्यांना रोखण्याची कसोटी असताना आता वाघ्या कुत्र्याच्या पुतळ्यालाही संरक्षण देण्याची वेळ पोलिसांवर आलीय. पोलिसांनी दहशतवाद्यांना रोखायचे की पुतळे राखत बसायचे असा सवाल या निमित्तानं निर्माण झालाय. एक अधिकारी आणि दहा पोलिसांची फौज वाघ्या कुत्र्याच्या पुतळ्याच्या दिमतीला ठेवावी लागतेय. यापूर्वीही पुतळा विटंबनेच्या घटनांच्या वेळी पुतळ्यांच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला होता.
 
आता पुन्हा एकदा हाच प्रश्न समोर आलाय. बॉम्बस्फोटाच्या घटना वारंवार घडत असताना पोलिसांवर नागरिकांच्या सुरक्षेची जबाबदारी वाढली आहे.... अशावेळी पुतळ्यांची राखण करण्यात पोलिसांनी वेळ घालवावा का या प्रश्नाचे उत्तर शोधून काढावेच लागेल.
 
 

First Published: Friday, August 3, 2012, 18:44


comments powered by Disqus