Last Updated: Sunday, December 18, 2011, 16:28
झी २४ तास वेब टीम, मुंबईभारतीय चित्रपटसृष्टीतलं योगदान लक्षात घेऊन चित्रमहर्षी दादासाहेब फाळके यांना भारतरत्न द्यावं, अशी मागणी दादासाहेबांचे नातू चंद्रशेखर पुसळकर यांनी केली. मुंबईत दादासाहेब फाळके चित्रपट महोत्सवाच्या निमित्तानं पहिल्यांदाच कार्निव्हलचं आयोजन करण्यात आलं.
चित्रपटसृष्टीला १०० वर्ष पूर्ण होताहेत. जुन्या पिढीला दादासाहेबांचं कर्तृत्व माहिती आहे. मात्र, नव्या पिढीतल्या अनेकांना दादासाहेब फाळके कोण होते, हे माहितीच नसल्याची खंत चंद्रशेखर पुसळकर यांनी व्यक्त केलीये.
First Published: Sunday, December 18, 2011, 16:28