कृपाशंकर राजकारणात पुन्हा सक्रीय? - Marathi News 24taas.com

कृपाशंकर राजकारणात पुन्हा सक्रीय?

www.24taas.com, मुंबई
बेहिशोबी मालमत्ताप्रकरणी अडचणीत सापडलेले काँग्रेस नेते कृपाशंकर सिंह पुन्हा एकदा चर्चेत आलेत. निमित्त आहे एका इफ्तार पार्टीचं...
 
मुंबई पोलिसांतर्फे हज भवनात आयोजित केलेल्या या इफ्तार पार्टीत मुख्यमंत्री, गृहमंत्र्यांसोबत त्यांचा स्टेजवरच्या वावराने अनेकांच्या भुवया उंचावल्यात. बेहिशोबी मालमत्ता प्रकरणी अडचणीत आल्यानंतर, कृपाशंकर यांची काँग्रेसच्या मुंबई प्रदेश अध्यक्षपदावरुन हकालपट्टी करण्यात आली होती. त्यानंतर काही दिवस कृपाशंकर सिंह राजकीय कार्यक्रमांतून गायब होते. मात्र, आता इफ्तार पार्टीत पुन्हा त्यांचं दर्शन झाल्यानं, ते पुन्हा राजकारणात सक्रिय होणार की काय? अशी शंका उपस्थित करण्यात येतेय.
 
.
व्हिडिओ पाहा :

First Published: Wednesday, August 8, 2012, 06:18


comments powered by Disqus