Last Updated: Monday, December 19, 2011, 04:01
झी २४ तास वेब टीम, मुंबई 
डॉक्टर बाबासाहेब आंबोडकर यांच्या आंतरराष्ट्रीय स्मारकाला इंदू मिलची सर्व साडे बारा एकर जागा मिळावी यासाठी रिपब्लीकन पक्षाचे कार्यकर्ते आज रेलरोको करणार आहेत. डोंबिवलीत रेल्वे स्थानकात सकाळी ११ वाजता रिपाइं कार्यकर्ते आंदोलन करणार आहेत. त्याखेरीज भांडुपमध्ये सकाळी रेलरोको आहे. वांद्रे स्थानकावर दुपारी रेल रोको होईल.
आरपीआय आठवले गटाचा आज राज्यव्यापी रेलरोको करण्यात येणार आहे. इंदू मिलची जमीन देण्याची मागणी आरपीआय तर्फे करण्यात येत आहे. आरपीआय आठवले गटातर्फे राज्यव्यापी रेलरोको करण्यात येणार असल्याने आता इंदू मिलची जमीन देण्यासाठी सरकारवरील दबाव वाढतो आहे.
रिपाइंचे रेल रोको वांद्रे स्थानकावर दुपारी ३ वा, मालाडला संध्याकाळी ५.३० वा, डोंबिवली, भांडूप मध्ये ११ वा. रेलरोको इंदू मिलच्या जमिनीसाठी करण्यात येणार असल्याने आज चाकरमान्यांचे चांगलेच हाल होणार आहे.
First Published: Monday, December 19, 2011, 04:01