म. रे. रखडली, लोकलचा डब्बा घसरला. - Marathi News 24taas.com

म. रे. रखडली, लोकलचा डब्बा घसरला.

झी २४ तास वेब टीम, मुंबई
 
सीएसटी-कल्याण लोकलचा डबा घसरल्यानं मध्य रेल्वेची वाहतूक आज सकाळी पुन्हा खोळंबली. सीएसटी-मस्जिद रेल्वे स्टेशनदरम्यान हा अपघात झाला आहे. प्लॅटफॉर्म क्रमांक ७ वरून निघाली होती. या लोकलचा सातवा डबा घसरला. सुदैवानं यात कोणतीही जिवीतहानी झाली नाही मात्र त्याचा रेल्वे वाहतूकीवर परिणाम झाला आहे.
 
अगदी सकाळी गर्दीच्या वेळेस हा अपघात झाल्याने चाकरमानी मात्र चांगलेच त्रस्त झाले.  अपघात झाल्याने मध्यरेल्वेच्या लोकल ट्रेन जवळजवळ २५ ते ३० मिनिटे उशीराने धावत होत्या अप आणि डाऊन मार्गावरील लोकलसेवा अतिशय धीम्या गतीनं सुरू आहे. सकाळच्या वेळेत ऑफिसला जाण्यासाठी प्रवाशांची गर्दी असते आणि नेमक्या याच वेळी लोकलचा डबा घसरल्यानं प्रवाशांना प्रचंड त्रास सहन करावा लागतो आहे.
 
अनेक स्टेशन्सवर गाड्या खोळंबल्यानं प्रवासी चालत जाणं पसंत करत आहेत. मध्य रेल्वेच्या प्रवाशांना पश्चिम रेल्वेनं प्रवास करण्याची मुभा देण्यात आली आहे. कालही ठाकुर्ली-दिवा दरम्यान ओव्हरहेड वायर तुटल्यानं रेल्वे वाहतुकीचा खोळंबा झाला होता.
 

First Published: Wednesday, December 21, 2011, 07:40


comments powered by Disqus