Last Updated: Sunday, December 25, 2011, 09:27
झी २४ तास वेब टीम, मुंबई 
प्रमोद महाजन यांच्या खुनाची शिक्षा भोगत असणाऱ्या प्रवीण महाजन यांच्या पत्नी सांरगी महाजन यांना मानवी हक्क आयोगाकडून दिलासा मिळाला आहे, त्यामुळे सारंगी महाजन यांना प्रवीण महाजन यांच्या मृत्युनंतर राज्य सरकारने ७ लाखाची नुकसान भरपाई द्यावी असे आदेश मानवी हक्क आयोगाने दिले आहेत.
सारंगी महाजन यांना प्रवीण महाजनांवर केलेल्या सर्व उपचाराचे पैसे द्यावेत, असा आदेश मानवी हक्क आयोगाने राज्य सरकारला दिले आहे. नुकसानभरपाई म्हणून सात लाख रुपये द्यावेत, असा आदेश राज्य सरकारला देण्यात आला आहे.
प्रमोद महाजन यांच्या हत्येप्रकरणी शिक्षा भोगताना तुरुंग प्रशासनाकडून उपचारात हलगर्जी झाल्याचा आरोप करण्यात आला होता. याबाबत संबंधित वैद्यकीय अधिकाऱ्यांची चौकशी करण्याचे आदेशही आयोगाचे अध्यक्ष न्यायमूर्ती क्षितीज व्यास आणि व्ही. जी. मुन्शी यांच्या खंडपीठाने दिला आहे. या आदेशावर राज्य सरकार कोणते पाऊल उचलते हे महत्त्वाचे ठरते, त्यामुळे तुर्तास तरी सांरगी महाजन यांना दिलासा मिळालेला आहे,
First Published: Sunday, December 25, 2011, 09:27