Last Updated: Thursday, December 29, 2011, 20:56
झी २४ तास वेब टीम, मुंबई 
इंदू मिल जागेच्या वादाबाबत सरकारनं मध्यस्थी केल्यानंतर या जमिनीवरचा ताबा काही दिवसांसाठी सोडणार असल्याचं आनंदराज आंबेडकरांनी सांगितलं आहे. इंदू मिलसंदर्भात केंद्रानं विचारपूर्वक निर्णय घेण्याची मागणी आर. आर. पाटलांनी केली आहे. यासंदर्भात मुख्यमंत्री आणि शिष्टमंडळ पंतप्रधानांची भेट घेणार आहे.
गृहमंत्री आर आर पाटील आनंदराज आंबेडकर आणि त्यांच्या समर्थकांची भेट घेतली आहे. इंदू मिलची जागा आंबेडकरांच्या स्मारकासाठी मिळावी या मागणीसाठी रिपब्लिकन सेनेचे कार्यकर्त्यांनी आज वरळी ते दादर मोर्चा काढला होता. या ठिकाणी गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी भेट दिली. इंदू मिलच्या जागेचा ताबा आनंदराज आंबेडकर आणि त्यांच्या समर्थकांनी घेतला होता.
स्मारक होईपर्यंत जागा न सोडण्याचा पवित्रा कार्यकर्त्यांनी घेतल्यामुळे राज्य सरकार अडचणीत आलं होतं. कोर्टानेही राज्य सरकारवर याबाबत ताशेरे ओढले होते. त्यामुळे हा प्रश्न तातडीने मार्गी लावण्यासाठी सरकारने हालचाली सुरु केल्या. उद्या मुख्यमंत्री आणि उपमुख्मंत्री यांच्यासह सर्वपक्षीय नेत्यांचं शिष्टमंडळ या जागेच्या संदर्भात पंतप्रधानांना भेटणार आहे.
First Published: Thursday, December 29, 2011, 20:56