तळीरामानां पोलिसांचा दणका - Marathi News 24taas.com

तळीरामानां पोलिसांचा दणका

झी २४ तास वेब टीम, मुंबई
 
नववर्षाचं सेलिब्रेशन करताना थर्टी फर्स्टच्या रात्री अनेकदा दारू पिऊन बेदरकारपणे वाहनं चालवली जातात. मुंबईत पोलिसांनी अशा वाहनचालकांची कसून तपासणी केली.
 
रस्त्यावर धिंगाणा घालणाऱ्यांनाही पोलिसांनी आपला हिसका दाखवला. पोलिसांनी तब्बल २६८९ जणांना ताब्यात घेतलं. यातले ७३९ जण दारू पिऊन वाहन चालवताना पकडले गेले.
 
थर्टी फर्स्टच्या रात्री पोलिसांनी सुमारे पावणेतीन लाख रुपयांचा दंड वसूल केलाय. मुंबईच्या अनेक भागात पोलिसांनी ही मोहीम राबवली.

First Published: Sunday, January 1, 2012, 21:59


comments powered by Disqus