निवडणूक आयोगाविरोधात आठवले कोर्टात - Marathi News 24taas.com

निवडणूक आयोगाविरोधात आठवले कोर्टात

www.24taas.com, मुंबई
 
जि.प. आणि नगरपालिका यांच्या निवडणूक कार्यक्रमामुळे आरपीआय गटाने विरोध करत कोर्टात जाण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आरपीआय गट आता या कार्यक्रमाविषयी कोर्टात याचिका दाखल करणार आहे.
 
काल राज्य निवडणूक आयोगानं जि.प. आणि मनपाच्या निवडणूक तारखा जाहीर केल्यानंतर या निवडणूक कार्यक्रमामुळे अनेक राजकिय पक्ष नाराज असल्याचे समजते. एकाच दिवशी मतदान आणि मतमोजणी तसचं मनपा निवडणूकीआधी जिल्हा परिषद निवडणुकिचे निकाल जाहीर करणं यासारख्या गोष्टीमुळे आता राजकिय पक्षात उलटसुलट चर्चा सुरु झाली आहे. राज्य निवडणूक आयोगानं जाहीर केलेल्या जिल्हा परिषद आणि महापालिका निवडणुकीच्या कार्यक्रमावर आरपीआयच्या आठवले गटानं आक्षेप घेतला आहे.
 
आरपीआयच्या आठवले गट हायकोर्टात याचिका दाखल करणार असल्याचे समजते. निवडणूक कार्यक्रमामुळे आरपीआय गट  नाराज असल्याने  हायकोर्टात याचिका दाखल करण्याचा निर्णय घेतला आहे. तर शिवसेना भाजपा तर्फे आज विनोद तावडे हे आज राज्य निवडणूक आयोगाची भेट घेणार आहेत. जि.प. निवडणुकीच्या मतमोजणी विषयी महायुती नाराज आहेत. जिल्हा परिषदांच्या निर्णयाचा परिणाम हा पालिका निवडणुकीवर होतील त्यामुळेच मतमोजणी ही पालिका निवडणूकीनंतर व्हावी अशी त्यांची मागणी आहे त्यामुळे निवडणूक कार्यक्रमाबाबत चर्चेला मात्र चागलंच उधाण आलं आहे

First Published: Wednesday, January 4, 2012, 13:39


comments powered by Disqus