RPIच्या नेत्यांना मस्ती चढली आहे- नामदेव ढसाळ - Marathi News 24taas.com

RPIच्या नेत्यांना मस्ती चढली आहे- नामदेव ढसाळ

www.24taas.com वेब टीम, मुंबई 
 
 आरपीआयच्या नेत्यांना मस्ती चढली आहे असं जळजळीत विधान नामदेव ढसाळ यांनी केलं आहे. यापुढे दलित पँथर  आरपीआयमध्ये राहणार नाही अशी घोषणाही ढसाळांनी केली. तसंच माझी नाराजी शिवसेनेवर नाही असंही त्यांनी सांगितलं.  मुंबई महापालिकेच्या जागा वाटपासंदर्भात शिवसेना, भाजप आणि आरपीआयची बैठक सेना भवनात आयोजीत करण्यात  आली आहे. या बैठकीला हजर राहण्यासाठी गेलेल्या ढसाळांच्या कार्यकर्त्यांना अपमानास्पद वागणुक दिल्याने ढसाळ संतप्त  झाले. आणि त्यानंतर ढसाळ बैठकीत सहभागी न होताच परतले.
 
 
महायुतीच्या बैठकीला उद्धव ठाकरे, रामदास आठवले, किरीट सोमय्या आणि सुधीर मुनगुंटीवार उपस्थित आहेत.
 
 
 

First Published: Friday, January 6, 2012, 09:59


comments powered by Disqus