आचारसंहिता भंग : अजित पवार अडचणीत - Marathi News 24taas.com

आचारसंहिता भंग : अजित पवार अडचणीत

www.24taas.com, मुंबई
 
आचारसंहिता भंग केल्याप्रकरणी अजित पवार यांच्याकडे राज्य निवडणूक आयोगाने  खुलासा मागितला आहे. पुण्यात विकासकामांच्या भूमिपूजनचा कार्यक्रम केला होता.
 
निवडणुकिच्या तारखा जाहीर झाल्या आणि त्यानंतर संपूर्ण राज्यात आचारसंहिता लागू झाली. पण आचारसंहिता लागू झाल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भूमिपूजन सोहळा उद्घाटन सोहळा केल्याने त्यांनी आचारसंहिता भंग केल्याचा आरोप विरोधकांनी केला होता.
 
पुण्याच्या अधिकाऱ्यांकडून माहिती घेतल्यानंतर राज्याच्या निवडणूक आयुक्क नीला सत्यनारायण यांी  कारवाईची पावलं उचलली आहेत. त्यानुसार पवार यांच्याकडे खुलासा मागितला आहे. यामुळे अजित पवार यांच्या अडचणी वाढल्या आहेत. अजित पवारांबरोबर राष्ट्रवादीचीही डोकेदुखी यामुळे सूरू होण्याची शक्यता आहे.
 
अजित पावरांनी शिवाजीनगरमधील उड्डाण पुलाच्या कामाचे भूमिपूजन केल्याचा आरोप  भाजपाने केला होता.  भाजपा अजित पवारांविरोधात निवडणूक आयोगाकडं तक्रार करणार असल्याची माहिती पुण्याचे शहराध्यक्ष विकास मठकरी यांनी दिली होती. भाजपाने दाखल केलेल्या तक्रारीची दखल राज्याच्या निवडणूक आयोगाने घेतली आहे.  भाजपाने  खडकवासला  निवडणुकीत बाजी मारत अजित पवारांवर मात केली होती. आता आचार संहितेची तक्रार करून पवारांच्या अडचणी वाढविल्या आहेत. त्यामुळ पुण्यात राजकारण तापलं आहे.

First Published: Friday, January 6, 2012, 13:43


comments powered by Disqus