Last Updated: Tuesday, January 10, 2012, 15:56
www.24taas.com, मुंबई फेब्रुवारी २०११ मध्ये मलेशियामध्ये सोमालियन चाच्याकडून एम.टी.सावीना कायलिन या अपहरण करण्यात आलेल्या जहाजातील १३ भारतीय सदस्यांची सुटका करण्यात आलीय़.
मुंबई विमानतळावर या अपह्त भारतीयांचं नातेवाईकांकडून काल आनंदात स्वागत करण्यात आलं. फेब्रुवारी २०११ मध्ये साविनाचे सोमालियन चाच्यांनी अपहरण केलं होतं. यात १३ भारतीयांसह ५ इटालियन नागरिकांचाही समावेश होता. ११ महिन्याच्या कैदेनंतर भारतात परतलेल्या या १३ भारतीय नागरिकांना पुन्हा एकदा मोकळा श्वास अनुभवता आलाय.
First Published: Tuesday, January 10, 2012, 15:56