Last Updated: Thursday, January 12, 2012, 00:13
www.24taas.com, मुंबई आघाडीतला जागावाटपाचा तिढा सुटला असला, तरी वॉर्ड वाटपावरुन आता काँग्रेस-राष्ट्रवादीत नवा तिढा निर्माण झाला आहे. तोट्याचे वॉर्ड मिळाल्याने राष्ट्रवादी नाराज आहे.
वर्चस्व असलेल्या भागात राष्ट्रवादीला वॉर्ड हवे आहेत. यासाठी काँग्रेसची मात्र तयारी नाही. त्यामुळे वॉर्डबाबत काँग्रेस राष्ट्रवादीत सहमती झालेली नाही.
आज दोन्ही पक्षाच्या मुंबई अध्यक्षांच्या बैठकीत याबाबत कोणताही तोडगा निघू शकलेला नाही.
First Published: Thursday, January 12, 2012, 00:13