१३/७ चे सूत्रधार मुंबईतच! - Marathi News 24taas.com

१३/७ चे सूत्रधार मुंबईतच!

www.24taas.com, मुंबई
 
दिल्ली आणि मुंबईतल्या बॉम्बस्फोटाचा सूत्रधार यासिन भटकळ आणि इडियन मुजाहिदीनचे त्याचे दोन सहकारी भायखळ्यातल्या हबीब बिल्डिंगमध्ये राहत होते अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे.
 
बॉम्बस्फोटानंतरही डिसेंबर २०११ पर्यंत हे दहशतवादी याच ठिकाणी राहत होते. भायखळा रेल्वे स्टेशनलगत असलेल्या हबीब बिल्डिंगच्या तिसऱ्या मजल्यावर ६० हजार रूपये डिपॉझिट देऊन त्यांनी जागा भाड्यानं घेतली होती. याच ठिकाणाहून त्यांनी दिल्ली आणि १३/७ च्या मुंबईतल्या बॉम्बस्फोटांचा कट रचल्याची माहिती समोर  आहे. यातल्या दोन पाकिस्तानी दहशतवाद्यांचीही ओळख पटली असून बकास आणि तवरेज अशी त्यांची नावं आहेत.
 
दरम्यान या तिघांना जागा मिळवून देणा-या सुलतान खानची पोलिसांनी चौकशी केली. त्यानेच जागेची मालकिण रूबीना कुरेशी आणि तिन्ही आरोपींची भेट घालून दिली होती. त्यानंतर एक लाख रूपये डिपॉझिट आणि आठ हजार रूपये भाडे देण्याच्या अटीवर जागा देण्याचं मान्य झाल्याचं सुलताननं सांगितलं आहे.

First Published: Monday, January 16, 2012, 12:17


comments powered by Disqus