मुंबई साखळी बॉम्बस्फोटातील आरोपी दाऊदचा मृत्यू

Last Updated: Friday, June 13, 2014, 09:52

1993 च्या मुंबई साखळी बॉम्बस्फोटातील आरोपी दाऊद फणसेचा मृत्यू झालाय. जे. जे. रुग्णालयात मृत्यू झालाय. विशेष टाडा न्यायालयानं त्याला शिक्षा सुनावली होती. मुंबईत आरडीएक्स आणण्याची जबाबदारी दाऊद फणसेकडे होती. न्यायालयात त्यानं गुन्हा कबुल केला होता.

याकूब मेमनच्या फाशीला सुप्रिम कोर्टाची स्थगिती

Last Updated: Monday, June 2, 2014, 14:58

याकूब मेमनच्या फाशीवर सुप्रिम कोर्टानं स्थगिती दिली आहे. याकूब मेमनचा दयेचा अर्ज दहा दिवसांपूर्वीच राष्ट्रपतींनी फेटाळला होता. याकूबची याचिका आता घटना पीठाकडे विचारार्थ पाठवण्यात आलाय. १९९३च्या मुंबई बॉम्बस्फोटप्रकरणी फाशी ठोठावण्यात आलेला याकूब मेमन एकमेव आरोपी आहे.

संजय दत्तची शिक्षा कमी करण्यासाठी केंद्रातून हालचाली

Last Updated: Wednesday, October 23, 2013, 17:41

१९९३ च्या बॉम्बस्फोट प्रकरणी शिक्षा भोगत असलेल्या बॉलिवूड अभिनेता संजय दत्त याची शिक्षा कमी करण्यासाठी केंद्रीय पातळीवरून हालचाल सुरू असल्याची माहिती मिळतेय.

संजय दत्तची मागणी, टाडा कोर्टाचे सीबीआयला निर्देश

Last Updated: Tuesday, May 14, 2013, 20:00

अभिनेता संजय दत्तनं येरवडा जेलमध्ये शरण येण्याची परवानगी मिळावी यासाठी टाडा कोर्टात याचिका दाखल केलीय. संजय दत्तची मागणी मान्य करणे शक्य आहे का, याबाबत टाडा कोर्टाने सीबीआयला निर्देश दिले आहेत. तसंच उद्यापर्यंतच म्हणणं मांडण्याचे आदेशही कोर्टानं दिले आहेत.

मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपीचा मृत्यू

Last Updated: Monday, May 6, 2013, 10:27

१९९३ मध्ये झालेल्या बॉम्बस्फोट मालिका खटल्यातील आरोपी इसाक मोहम्मद हजवाने याचे रविवारी दीर्घ आजाराने निधन झाले.

संजय दत्तला मिळालेली शिक्षा योग्य आहे का?

Last Updated: Thursday, March 21, 2013, 17:27

संजय दत्तला गुन्ह्याच्या मानाने खूप मोठी शिक्षा दिली गेली असल्याचं बॉलिवूड कलाकारांचं म्हणणं आहे.तुम्हाला काय वाटतं?

बॉलिवूड म्हणतं `संजय दत्त गुन्हेगार नाही!`

Last Updated: Thursday, March 21, 2013, 15:53

संजय दत्तला शिक्षा सुनावल्यावर संपूर्ण बॉलिवूडला दुःख झालं आहे. ट्विटरवर बॉलिवूडने आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.

मुंबईत का झाले होते बॉम्बस्फोट? : घटनाक्रम

Last Updated: Thursday, March 21, 2013, 14:04

मार्च १९९३ मध्ये झालेले साखळी बॉम्बस्फोट १९९२च्या डिसेंबरमध्ये बाबरी मशीद उद्ध्वस्त केल्याचा `बदला` म्हणून केले गेले होते. या घटनेचा आणि खटल्याचा थोडक्यात घनटाक्रम.

१३/७ चे सूत्रधार मुंबईतच!

Last Updated: Monday, January 16, 2012, 12:17

दिल्ली आणि मुंबईतल्या बॉम्बस्फोटाचा सुत्रधार यासिन भटकळ आणि इडियन मुजाहिदीनचे त्याचे दोन सहकारी भायखळ्यातल्या हबीब बिल्डिंगमध्ये राहत होते अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे.