Last Updated: Tuesday, January 17, 2012, 08:09
www.24taas.com, मुंबई एलिस्टर परेरा आणखी काही दिवस तुरुंगाबाहेर राहणार आहे.सोमवारी एलिस्टर परेरा कोर्टात शरणागती पत्कारायला गेला होता, पण सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाची प्रत मुंबईत पोहचू शकली नसल्यामुळे ती प्रत मिळेपर्यंत परेरा तुरुंगाबाहेर राहील.
सुप्रीम कोर्टाच्या ऑर्डरची कॉपी मुंबईत येणार आल्यानंतरच परेरा तुरुंगात जाणार. सोमवारी परेरा शिवडी कोर्टात शरणागती पत्कारण्यासाठी गेला होता. सुप्रीम कोर्टानं एलिस्टर परेराला हिट एण्ड रनच्या गुन्ह्यात जामीन फेटाळत तीन वर्षाची शिक्षा कायम ठेवली होती. १२ नोव्हेंबर २००६ ला बांद्र्याच्या कार्टर रोडवर एलिस्टर परेराने सात मजूरांना कारने चिरडत पळ काढला होता.
या अपघातात इतर सात मजूरही गंभीर जखमी झाले होते. याप्रकरणी सेशन कोर्टाने सहा महिन्याची शिक्षा ठोठावत मजूराना पाच लाख भरपाई देण्याचा आदेश दिला होता. त्यावर एलीस्टरने मुंबई हायकोर्टात पुन्हा शिक्षेला आव्हान दिल होतं. मात्र सुप्रीम कोर्टानं हायकोर्टाचा निर्णय कायम ठेवला.
First Published: Tuesday, January 17, 2012, 08:09