शौचालयं गेली कुठे ?? - Marathi News 24taas.com

शौचालयं गेली कुठे ??

हेमंत बिर्जे, www.24taas.com, मुंबई
 
शिवसेना-भाजप युतीनं २००७ च्या  निव़डणूकीत ३५ हजार शौचालयं बांधण्याचं वचननाम्यात आश्वासन मुंबईकराना दिलं होतं. युतीच्या वचनाम्यातील शौचालये बांधली न गेल्यानं शिवसेना-भाजप युतीचा स्वच्छ मुंबई, हरीत मुंबईचा नारा फोल ठरल्याचा आरोप विरोधी पक्षांनी केला आहे.
 
मुंबईतले ६० टक्के मतदार झोपडत राहतात. या मतरांना खुश करण्यासाठी शिवसेना-भाजप युतीनं २००७च्या निव़डणूकीत ३५ हजार शौचालये बांधण्याचं आश्वासन दिलं होतं. मात्र केवळ १० हजार शौचालयं बांघली गेली. त्यामुळं ८० झोपडपट्टीधारकामागे एक शौचालय उभ राहू शकलं आहे. ही शौचालयं बांधली न गेल्यामुळे शिवसेना-भाजप युतीचा 'स्वच्छ मुंबई,हरीत मुंबई'चा नारा फोल ठरल्याचा आरोप विरोधी पक्षानी केला आहे.
 
विरोधी पक्षाच्या आरोपाचं युतीच्या नेत्यांनी खंडन केलंय. १० हजार शौचालयं बांधल्याचं सांगत जागेच्या कमतेमुळं ३५ हजाराचा आकडा गाठता आला नसल्याचं स्पष्टीकरण युतीचे नेते देत आहेत. तर जागा नसताना आश्वासन दिलं कसं असा प्रश्न विरोधक विचारत आहेत. आगामी निवडणुकीत या प्रश्नावरुन विरोधक सत्ताधाऱ्यांची कोंडी करण्याची शक्यता आहे.
 

First Published: Tuesday, January 17, 2012, 08:47


comments powered by Disqus