Last Updated: Wednesday, January 18, 2012, 16:27
www.24taas.com, मुंबई मुंबईच्या इतिहासात १८ जानेवारी हा एक वेगळीच कलाटणी देणारा दिवस म्हणून ओळखला जातो. डॉक्टर दत्ता सामंत यांच्या नेतृत्वाखाली पुकारण्यात आलेल्या गिरणी कामगाराच्या संपाला आज ३० वर्ष पूर्ण होत आहेत. मात्र अद्यापही गिरणीकामगारांना न्याय मिळालेला नाही.
६५ गिरण्यांमधल्या कामगारांचा अभूतपुर्व संप अशी मुंबईनेच नाही, तर साऱ्या जगानं त्याची नोंद घेतली आहे. अडीच लाख लोकांनी या संपात भाग घेतला होता. आज ३० वर्षानंतरही लढवय्या गिरणी कामगारानी हा संप आपल्या चिकाटीवर सुरुच ठेवला आहे. कामगार संघटनाची वेगवेगळी भूमिका आणि राजकीय दिशाहीन धोरणं यामुळे गेली ३० वर्ष गिरणी कामगार भरडला गेला.
गिरण्यांच्या चिमण्यांची जागा आता टॉवर्सनी घेतली. सरकारनेही संप मोडून काढावा म्हणून जे धोरण राबवलं, त्याच्या तुलनेत नोकऱ्यांबद्दल उदासीनता दिसतेय. एवढंच काय तर गिरणी कामगारांच्या वारसांना घराच्या मुद्यावरुन अजूनही ठोस निर्णय होत नाही. गिरणी कामगारांनी मात्र हा लढा असाच पुढे सुरु ठेवण्याचा निर्धार केला आहे.
First Published: Wednesday, January 18, 2012, 16:27