खुशखबर : गिरणी कामगारांना मिळणार हक्काची घरे

Last Updated: Friday, February 21, 2014, 19:46

गिरणी कामगारांच्या आंदोलनाला अखेर यश आलंय. भाडेतत्त्वावरील एमएमआरडीए बांधत असलेली ५० टक्के घरे गिरणी कामगारांना देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. यामुळे १७ ते १८ हजार गिरणी कामगारांना घरे मिळणार आहेत.

घरांसाठी गिरणी कामगारांचा मुंबईत मोर्चा

Last Updated: Wednesday, October 10, 2012, 17:52

हक्काच्या घरासाठी गिरणी कामगार पुन्हा रस्त्यावर उतरलेत. मुंबईतल्या गिरणी कामगारांनी भायखळा ते आझाद मैदान असा मोर्चा काढलाय. गिरणी कामगारांना त्यांच्या हक्काची घरं कधी मिळणार? असा सवाल या कामगारांनी उपस्थित केलाय.

गिरणी कामगारांचा म्हाडा लॉटरीला विरोध

Last Updated: Thursday, June 28, 2012, 13:06

गिरणी कामगारांच्या घरांच्या लॉटरी प्रक्रियेला सुरूवात झालीय. मात्र ही लॉटरी थांबण्यासाठी दोन ते अडीच हजार गिरणी कामगारांनी एस व्ही रोडवर मोर्चा काढला.

गिरणी कामगारांना ७.५० लाखात घर

Last Updated: Saturday, April 21, 2012, 12:07

मुंबईतील गिरणी कामगारांसाठी 'म्हाडा'च्या वतीने मुंबईत बांधलेल्या घरांच्या किमतीत १० टक्क्यांची सवलत देण्याची घोषणा मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी शुक्रवारी विधानसभेत केली. त्यामुळे गिरणी कामगारांना आता साडेसात लाखांत घर मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

गिरणी कामगारांचे बेमुदत उपोषण

Last Updated: Tuesday, April 10, 2012, 13:44

मुंबईतल्या गिरणी कामगार नेत्यांनी आझाद मैदानावर बेमुदत उपोषण सुरु केलं आहे. घरांच्या किंमती ठरवण्यात सरकार उदासिन असल्याचा आरोप गिरणी कामगारांनी केला आहे.

गिरणी कामगारांना कुणी घर देईल का?

Last Updated: Tuesday, March 20, 2012, 18:37

गिरणी कामगारांच्या घरांबाबत सरकारनं आणखी एक समिती नेमुन वेळकाढूपणा चालवला आहे. घरांच्या किंमती कमी करता येतील काय बाबत आणखी एका समितीची स्थापना करण्यात आलीय

मनसे-सेना एकत्र देणार लढा, गिरणी कामगारांसाठी

Last Updated: Tuesday, March 20, 2012, 11:03

गिरणी कामगारांना मोफत घरं देण्याच्या मुद्यावरून विधानसभेत काल जोरदार हंगामा झाला. गिरणी कामगारांच्या घरासाठी प्रत्येकी ८ लाख ६४ हजार रूपये भरावेच लागतील असं निवेदन गृहनिर्माण राज्यमंत्री सचिन अहिर यांनी करताच सभागृहात गोंधळ उडाला.

३० वर्षं संघर्षाची...

Last Updated: Wednesday, January 18, 2012, 16:27

मुंबईच्या इतिहासात १८ जानेवारी हा एक वेगळीच कलाटणी देणारा दिवस म्हणून ओळखला जातो. डॉक्टर दत्ता सामंत यांच्या नेतृत्वाखाली पुकारण्यात आलेल्या गिरणी कामगाराच्या संपाला आज ३० वर्ष पूर्ण होत आहेत. मात्र अद्यापही गिरणीकामगारांना न्याय मिळालेला नाही.

सरकार विरोधात गिरणी कामगारांचं आंदोलन?

Last Updated: Tuesday, December 13, 2011, 15:48

गिरणी कामगारांना अजूनही घरांचे वाटप झाले नसल्यामुळे राज्य सरकारच्या विरोधात पुन्हा एकदा आंदोलन करणार असल्याचा इशारा गिरणी कामगारांनी दिलाय. काल हुतात्मा बाबू गेनू यांची पुण्यतिथी होती. या हुतात्म्याला आदरांजली वाहण्यासाठी मुंबईत गिरणी कामगार एकत्र आले होते.