दिवाळीसाठी खास रेल्वे - Marathi News 24taas.com

दिवाळीसाठी खास रेल्वे

झी २४ तास वेब टीम, मुंबई 
दिवाळीसाठी गावी जाणार-या प्रवाशांच्या सोयासाठी मध्य रेल्वने २५ आॅक्टोबरपासून खास विशेष गाड्या सो़डण्याचा निर्णय घेतला आहे.
मुंबई ते मडगाव आणि नागपूर-अहमदाबाद दिवाळीसाठी विशेष गाड्या सो़डण्यात येणार आहेत. मुंबई ते मडगाव दरम्यान सहा जादा तर नागपूर-अहमदाबाद दरम्यान दहा सेवा चालविण्यात येणार आहेत.
 
सीएसटी मुंबईपासून मडगावसाठी ०१४२१ ही गाडी मंगळवार, गुरूवार, शुक्रवार या दिवशी दुपारी १२. २० मिनिटांनी तर  नागपूर ते अहमदाबादसाठी दर शनिवारी सकाळी ९.३० वाजता नागपूरहून सुटेल. अहमदाबादहूनवरून  नागपूरसाठी दर रविवारी सायंकाळी ४.३० वाजता गाडी सुटेल. या गाड्यांचे आरक्षण सुरु झाले आहे.

First Published: Saturday, November 5, 2011, 13:21


comments powered by Disqus