कफ परेडला मुलांच्या अपहरणाचा प्रयत्न - Marathi News 24taas.com

कफ परेडला मुलांच्या अपहरणाचा प्रयत्न

www.24taas.com, मुंबई
 
मुंबईतल्या कफ परेड भागातल्या दोन मुलांच्या अपहरणप्रकरणी पोलिसांनी एका महिलेला ताब्यात घेतलं आहे. मात्र एक आरोपी फरार झाला आहे.
 
शनिवारी संध्याकाशी दोन मुलं आपल्या घराजवळ खेळत असताना एका व्यक्तीनं फूस लावून जबरदस्तीनं आपल्यासोबत घेऊन जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, मुलांनी आरडाओरड केल्यानंतर आसपासचे लोक जमा झाले. त्यावेळी अपहरणकर्ता पळून जाण्यात यशस्वी झाला. मात्र एका महिलेला पोलिसांनी ताब्यात घेतलं. संतप्त नागरिकांनी या घटनेनंतर  कफ परेड पोलीस स्टेशनला घेराव घातला. लोकांची गर्दी कमी करण्यासाठी  पोलिसांना लाठीचार्जही करावा लागला.
 
याच परिसरात दोन मुलींवर झालेल्या बलात्कार आणि हत्येचं गुढ अजूनही उलगडलेलं नाही. त्यामुळे परिसरातील नागरिक पोलिसांवर चांगलेच नाराज आहेत. पोलीस सध्या आधीच्या खुनाच्या घटनेचा आणि अपहरणाच्या प्रयत्नाचा एकमेकांशी काही संबंध आहे का याबाबत या महिलेची चौकशी करत आहेत.
 

First Published: Sunday, January 22, 2012, 08:42


comments powered by Disqus