Last Updated: Monday, January 23, 2012, 09:04
www.24taas.com,मुंबई 
मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी शिवसेनेवर पुन्हा एकदा हल्लाबोल केला आहे. मनाने हरल्यानेच शिवसेना फोडाफोडीचं राजकारण करत असल्याचं सांगत त्यांनी शिवसेनेवर टीकास्त्र सोडलं आहे. माणूस आतून लढाई हरला की, भलतेसलते उद्योग करायला लागतो.
शिवसेनेचे करून दाखवले ही जाहिरातबाजी आणि फोडाफोडीचे राजकारण हे त्याचाच भाग असल्याचं राज ठाकरेंनी म्हंटलय. एका मराठी वर्तमानपत्राला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी शिवसेनेवर चांगलच तोंडसुख घेतलं. दुस-या पक्षातील नेते फोडतान आपला खासदार पक्ष का सोडतो याचा विचार शिवसेनेनं पहिल्यांदा करायला हवा असं सांगून मनसेनं कधीच फोडाफोडीचं राजकारण केलं नाही असंही राज ठाकरे यांनी स्पष्ट केलं.
शिवसेनेतील निष्ठावान कार्यकर्ते फोडाफोडीच्या राजकारणामुळे कायम उपेक्षित राहणार असून आगामी काळात खासदार परांजपेंप्रमाणे शिवसेनेत बंडांचे झेंडे फडकल्यास आश्चर्य वाटू नये असं सुतोवाचही राज ठाकरेंनी केलं आहे.
First Published: Monday, January 23, 2012, 09:04