Last Updated: Wednesday, October 26, 2011, 05:48
झी २४ तास वेब टीम, मुंबई शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे आणि काँग्रेसचे संजय निरुपम यांच्यातील वाद संपण्याची चिन्ह दिसत नाहीत. मुंबईतील कांदिवली भागात मध्यरात्रीच्या सुमारास शिवसैनिकांनी संजय निरुपम यांच्या पोस्टर्सला काळं फासलं. हा 'पोस्टर्स' वाद पेटायला सुरुवात झाली आहे.
शिवसैनिकांनी संजय निरुपम यांच्या पोस्टर्सला काळं फासल्यामुळं संतप्त झालेल्या निरुपम समर्थकांनीही शिवसेनेच्या पोस्टर्सला काळं फासलं. पोलिसांनी निरुपम समर्थकांना मज्जाव केला. यावेळी पोलीस आणि निरुपम समर्थकांमध्ये झटापटही झाली.
उत्तर भारतीय मेळाव्यात काँग्रेसचे संजय निरुपम यांनी मुंबई आणि महाराष्ट्राचं ओझं उत्तर भारतीयांवर असल्याचं प्रतिपादन केलं होतं. त्यांनी ठरवलं तर मुंबईचे व्यवहार ठप्प होतीलं, असं बोलल्याने वाद उफाळला. उद्धव ठाकरे यांनी दात घशात घालण्याचा इशारा दिला होता.
First Published: Wednesday, October 26, 2011, 05:48