१३/७च्या दहशतवाद्याचं 'दगडी चाळ' कनेक्शन - Marathi News 24taas.com

१३/७च्या दहशतवाद्याचं 'दगडी चाळ' कनेक्शन

www.24taas.com, मुंबई
 
१३/७ मुंबई बॉम्बस्फोटातला दहशतवादी दगडी चाळीत जात होता अशी धक्कादायक माहिती पुढे आली आहे. दगडी चाळीतल्या गुलाब गवळी मेडिकल आणि फिटनेस सेंटरमध्ये १० ऑगस्टपासून तीन महिन्यांसाठी या दहशतवाद्याने प्रवेश घेतला होता.
 
हा दहशतवादी दोन महिने या जिममध्ये गेला. मात्र, कुणाच्या माध्यमातून त्याने या जीममध्ये प्रवेश मिळवला, याचा शोध आता पोलीस घेत आहेत. जीममधलं मस्टर ATS ने ताब्यात घेतलं आहे. १३/७ च्या बॉम्बस्फोटात TNT, अमोनियम नायट्रेट आणि फ्युएल ऑईल या स्फोटकांचा वापर करण्यात आला होता.
 
बॉम्बस्फोटांनंतर या दहशतवाद्याचं दगडीचाळीतल्या या जीममध्ये जाणं-येणं असल्याने आता त्यादृष्टीनं तपासाची चक्र फिरू लागली आहेत.
 

First Published: Friday, January 27, 2012, 21:25


comments powered by Disqus