Last Updated: Wednesday, October 26, 2011, 15:35
झी २४ तास वेब टीम, मुंबईमुंबई शेअर बाजारात समवत २०६८ च्या मुहूर्तच्या सौद्यांमध्ये फार उत्साह दिसून आला नाही. बाजाराचा निर्देशांक १७,३३६ अंकांवर खुला झाला मात्र बाजार १७२८८ अंकांवर बंद झाला. कालच्या तुलनेत ३४ अंकांनी निर्देशांक वधारला.
बाजाराने सौद्यांदरम्यान १७,३५० अंकांचा उच्चांकाची नोंद केली. कॅपिटल गूडस, हेल्थ केअर, पॉवर कंपन्यांचे शेअर्स वधारले तर दुसरीकडे तंत्रज्ञान आणि तेल कंपन्यांच्या शेअर्सच्या किंमतीमध्ये घसरण झाली. निफ्टीही ५२१४ अंकांवर खुला तर ५२०१ अंकांवर बंद झाला.
शेअर बाजाराचे लक्ष युरोपमधल्या आर्थिक आरिष्टा संदर्भात होणाऱ्या युरोपियन युनियनच्या परिषदेकडे लागलं आहे. मागच्या वर्षी दिवाळीच्या दिवशीच निर्देशांकाने २१,००५ अंकांची विक्रमी नोंद करत दमदार सुरवात केली होती. पण नंतर वर्षभरात झालेल्या प्रचंड चढउतारांमध्ये गुंतवणुकदारांना १७ लाख कोटी रुपयांचे नुकसान सोसावं लागलं, त्यामुळेच मागील समवत २०६७ अनेक गुंतवणुकदार विसरु पाहतील.
First Published: Wednesday, October 26, 2011, 15:35