Last Updated: Thursday, October 27, 2011, 11:26
झी २४ तास वेब टीम, मुंबई महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंनी यांनी झी २४ तासच्या सर्व विभागांना भेट देत तिथे चालणाऱ्या कामकाजाची माहिती जाणून घेतली. प्रत्येक विभागाचे काम कसे चालते, त्यांच्या जबाबदाऱ्या काय असतात या संबंधीच्या तपशीलात त्यांना रस होता.
झी २४ तासच्या नव्याने लाँच होणाऱ्या वेब टीमच्या डेस्कला देखील त्यांनी भेट दिली. वेब टीमचे हेड प्रशांत जाधव यांनी वेबसाईटवर भविष्याला अधिक मागणी असते असं सांगितल्यावर खरं त्यावर त्यांना बोलकी प्रतिक्रिया द्यायची होती पण त्यांनी केवळ मिश्कीलपणे हे संभाषण रेकॉर्ड होतं आहे का अशी विचारणा करत शब्दाविण भाष्य करण्याला पसंती दिली.
त्यानंतर खरा रंगला तो प्रश्नोत्तराचा तास. झी २४ तासच्या कर्मचारी वर्गाच्या अनेकविध प्रश्नांच्या फैरीला त्यांनी आपल्या खास शैलीत उत्तरे दिली. आणि अखेरीस त्यांनी कुंचल्याच्या फटकाऱ्यातून व्यंगचित्र रेखाटत आपल्या भेटीची सांगता संस्मरणीय केली.
First Published: Thursday, October 27, 2011, 11:26