Last Updated: Saturday, October 29, 2011, 10:14
झी २४ तास वेब टीम, मुंबईमुंबईच्या समुद्रात अडकलेल्या एम.व्ही पॅवित जहाजाच्या लिलावाची प्रक्रिया सुरू झाली आहे. पुढच्या महिन्यात या जहाजाची लिलावाद्वारे विक्री केली जाणार आहे. मात्र, हे जहाज समुद्रातून बाहेर काढण्यासाठी तब्बल 3.5 कोटी रूपये खर्च आला होता. हा खर्च जहाजाच्या किंमतीपेक्षाही जास्त आहे. विशेष म्हणजे या जहाजाची किंमत ठरवण्यासाठी केंद्र सरकारनं कुणाचीही नेमणूक केलेली नाही.
काही महिन्यांपूर्वी एम.व्ही पॅवित हे जहाज जुहू बीचवर अडकलं होतं. दुबईस्थित कंपनीचं पॅवित जहाज बाहेर काढण्यासाठी 3.5 कोटी खर्च इतका आलाय. तर लिलावाद्वारे मिळणारी किंमत अत्यल्प असणार आहे.
First Published: Saturday, October 29, 2011, 10:14