Last Updated: Monday, February 6, 2012, 18:28
www.24taas.com, मुंबई 
मुंबईकरांना उद्या पाणीकपातीला सामोरं जावं लागणार आहे. महालक्ष्मी रेसकोर्स इथं १६५० मिमी व्यासाच्या वैतरणा जलवाहिनीतून गळती होत आहे. यासाठी उद्या या जलवाहिनीचं दुरुस्तीचं काम होणार आहे.
त्यामुळे मंगळवारी ७ फेब्रुवारीला सकाळी ९ ते मध्यरात्री १२ या वेळेत पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. या काळात नायर, रुग्णालय, महालक्ष्मी आणि मुंबई सेंट्रल रेल्वे स्टेशन, वर्कशॉप, कर्मचारी वसाहत, ताडदेव रोड, नौशीर बरोचा मार्ग, तुळशीवाडी परिसर इथं पाणीपुरवठा होणार नाही. त्यामुळे या भागातल्या रहिवाशांनी अतिरिक्त पाणीसाठा करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.
त्यामुळे मुंबईकरांना पुन्हा एकदा उद्याच्या दिवसासाठी पाणीकपातीला सामोरं जावं लागणार आहे. पाणीकपात होणार असल्याने मुंबईकरांना पुन्हा एकदा उद्याचा दिवस पाण्याविनाच काढावा लागणार आहे.
First Published: Monday, February 6, 2012, 18:28